Section Menu 

Section Menu 

डॉ. सचिन कुबेर एम एस  शल्य विशारद

 इमेल :- drskuber@gmail.com /

 herniaclinik@gmail.com  | स्काएपे : drskuber

डेक्कन जिमखाना शाखा

श्रीयश हॉस्पिटल , गरवारे पूल ,डेक्कन जिमखाना ,चितळे बंधू मिठाई वाले  समोर , संभाजी पुतळ्या समोर ,पुणे ४११००४

फोन: ०२०-२५६६१०२० | भ्रमणध्वनी :-  ९८५००६३९२६ / ९४२२९४६०११

रुग्ण तपासण्याची वेळ  : सकाळी १० ते १  व  सायंकाळी  ५.३० ते ०८ पर्यंत रविवारी सुट्टी

सिंहगड पथ शाखा

मातोश्री क्लिनिक , शॉप क्रं.४ , " शिवपुष्प पार्क " आनंदनगर , सिंहगड पथ, सनसिटी रस्ता , पुणे ४११०५१

फोन: 020-24345627  |  भ्रमणध्वनी:-९८५००६३९२६ / ९४२२९४६०११

रुग्ण तपासण्याची वेळ  :सायंकाळी ८ - १० प.

आमचा दृष्टीकोन

Photograph of a good looking man.

हर्निया क्लिनिक मध्ये आम्ही गेली ६ वर्षे अतिशय उत्तम आणि विनम्र सेवा रुग्णांना देण्यास कटिबद्ध  आहोत.हर्निया क्लिनिक मध्ये रुग्णांना प्रेमळ , उत्साही व आनंदी वातावरणात सेवा देणे हे आमचे ध्येय आहे. रुग्णांना त्यांच्या आजारातून  मुक्त करताना त्यांच्या दुखावर प्रेमळ फुंकर घालून मनाने उभारी देणे हे आम्ही आमचे कर्तव्य समजतो . या ठिकाणी आल्यावर रुग्णांना उत्तम दर्जाची हर्निया तसेच इतर शस्त्रक्रिया सवलतीत तसेच अल्प खर्चात करून देताना हर्निया परत उद्भवणार नाही याची आम्ही दक्षता  घेतो .आंतरराष्ट्रीय दर्जाची सेवा रुग्णांना देवून त्यांचे आशीर्वाद आम्हाला हवे आहेत आणि ते आम्हाला मोलाचे वाटतात.आमच्या येथे रुग्णांशी प्रेमळ आणि सौहार्दपूर्ण संवाद केला जातो , त्यांच्या समस्या पूर्ण समजावून घेतल्या जावून योग्य उपचार केले जातात. आम्हाला सांगण्यास आनंद होतो कि गेल्या ६ वर्षात  हर्निया व इतर रुग्णांचे हजारो आशीर्वाद " हर्निया क्लिनिकला " मिळालेले आहेत. 

हर्निया क्लिनिकमध्ये केली जाणारी शस्त्रक्रिया

हर्निया क्लिनिक मध्ये केली जाणारी हर्निया शस्त्रक्रिया ही अतिशय उत्तम , वेदनारहित , यशस्वी होते असे आमचे हजारो रुग्ण सांगतात. या ठिकाणी हर्निया शस्त्रक्रिया  केल्यानंतर हर्निया परत उद्भवण्याचे  प्रमाण नगण्य आहे. हजारो समाधानी रुग्ण आणि उत्तम कर्मचारी वर्ग तसेच निष्णात शल्यविशारद असल्यामुळे "हर्निया क्लिनिक " हे वैशिष्ट्यपूर्ण ठरते. रुग्णांच्या विश्वास आणि मागणीमुळे आता आम्ही "हर्निया क्लिनिकची " दुसरी शाखा सुद्धा सुरु केली आहे. ही शाखा सिंहगड रस्ता येथे असून पश्चिम पुण्यातील रुग्णांना सेवा देण्यास कटिबद्ध आहे.

आमच्या सल्ल्याची वैशिष्ट्ये :

स्वच्छ ,पारदर्शी सल्ला

उत्तम सल्ला

सल्ला हा खालील गोष्टींवर आधारित आहे.

नम्रपणा

जगभरातील हर्निया  तज्ञांना अनुसरून

अत्याधुनिक तंत्रज्ञान

पुराव्यांवर आधारित

सखोल ज्ञान